मुंबई – मागील विधानसभा निवडणूक सोडली तर गेली २५ वर्षे दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे वर्चस्व होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची एकहाती सत्ता या विधानसभा क्षेत्रावर राहिलेली आहे. मात्र गेल्यावेळी कुणबी अस्मितेच्या मुद्दय़ावर मतविभाजन होऊन २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या परभावनांतर त्याचे वर्चस्व कमी होऊ लागले आणि ज्याचे तात्कालिन पर्यावरण मंत्री आणि खेडचे सुपूत्र रामदास कदम यांनी आक्रमकपणे या शिवसेनेच्या बालेकिल्लय़ाची सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत दळवी विरोधकांच्या साह्यने दापोली मंडणगडात कदम यांनी आपले वर्चस्व केले. त्यानंतर हळू हळू त्यांनी सूर्यकांत दळवींना पक्षाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पाडले.
चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब – नवाब मलिक
यानंतर रामदास कदम यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण करत आपल्या मुलाला विधानसभेचे तिकीट मिळवून दिले आणि विधानसभेवर निवडणून आणले. त्यानंतर दोन वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना दोन वर्षात बऱ्याच पक्षांनी पक्षप्रवेशाच्या संधी दिल्या मात्र त्यांनी पक्षप्रवेश केला नाही.
मागील आठवड्यात दापोली विधानसभा मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडून आल्या आणि सूर्यकांत दळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली. सूर्यकांत दळवींच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कारवाईचा बडगा: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करणार; अनिल परबांचा इशारा
कार्यकर्त्यांनी जरी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी देखील सूर्यकांत दळवींनी ऐनवेळी प्रवेश केला नाही. यामागे मातोश्रीवरून आलेल्या संदेशाचा हात होता. मागील काळात कदम आणि जेष्ठ नेत्यांचे बिनसल्याने आता सूर्यकांत दळवींना आता मात्रोश्रीवरून ताकद मिळणार आहे असं बोललं जात आहे. लवकरच त्यांना शिवसेनेचे मोठे पद मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.
Read Also :
- सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
- सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!