बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंर मुंबई महापालिकेने त्यांचा बंगला सील केला आहे. बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.
वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. हा परिसर महापालिकेकडून सॅनिटायझ करण्यात आला आहे.
दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आधी आमिर खान, जान्हवी कपूर आणि करण जोहर या सेलिब्रेटींच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनची लागण झाल्याचे समोर आले होते.