मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने ट्विट करत बलात्काराचे आरोप केले आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंडे यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असाही खुलासा केला आहे.
मुंडेवर आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आता एकामागोमाग एक ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच मृत्यूपर्यंत आपण लढा देत राहणार असल्याचे म्हटले आहे.
Aaj mujhe jo bhi log bura Bol rahe hain wo or baki puri janta Dhananjay Munde se puchhe ki achanak se report k kuchh din pahle hi mujhe kyu block Kar Diya inculing Twitter,our jab police puri janch karegi sab samne ayega @narendramodi @Dev_Fadnavis @supriya_sule @AjitPawarSpeaks
— renu sharma (@renusharma018) January 12, 2021
धनंजय मुंडे यांनी मला तक्रारीच्या काहीदिवस आधीच सोशल मीडियावर का ब्लॉक केले ? असा प्रश्न उपस्थित करत पोलीस चौकशीनंतर सर्व समोर येईल असे म्हटले आहे.
Ye blackmail k alawa koi our baat ka sahara le bhi nahi sakta, par Mai ladungi till mu death!!
— renu sharma (@renusharma018) January 12, 2021
Exactly dhongi ko saza zarur milegi https://t.co/kLwHh792oZ
— renu sharma (@renusharma018) January 12, 2021
तसेच आणखी काही ट्विट करत ब्लॅकमेलच्या मुद्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची धनंजय मुंडे मदत घेऊ शकत नाही, पण मी मृत्यूपर्यंत लढा देईल असे रेणू शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच, आणखी एका ट्विटला उत्तर देताना ढोंगीला शिक्षा नक्की मिळणार, असेही त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- कोर्टाकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग, समिती अदानी-अंबानींना सोयीस्कर असाच रिपोर्ट देईल – राजू शेट्टी
- … तरीही पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा निर्धार
- राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू, मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका
- उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, ऊर्जामंत्र्यांची ग्वाही
- कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस