मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष संपता संपत नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवाब मलिक आणि वानखेडे हे एकमेकांवर सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक रोजच्या रोज वानखेडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून त्यांना अडचणीत आणत आहेत.
‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार
मध्यरात्री समीर वानखेडेंचे फोटो व्हायरल करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात ट्विट बॉम्ब फोडला होता. मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट केला होता आणि हा फोटो निकाहच्या वेळेच्या असल्याचा दावा करत फोटोमधील व्यक्ती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय.
कृषी कायदे रद्द करून मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला; देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमने
आता त्याला प्रत्युत्तर म्हणून स्वतः समीर वानखेडे यांनी ट्विटने उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटनंतर समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही काही फोटो शेअर केले आहेत आणि ”आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो,” असे म्हटले आहे. सध्या मलिक आणि वानखेडे यांनी टि्वट केलेल्या फोटोंवरुन सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात दिवसेंदिवस ट्विटरवर वॉर सुरु आहे. नवाब मलिक रोज एक नवीन पुरावा ट्विटरवर टाकत आहेत. त्याला समीर वानखेडे कधी उत्तर देत आहेत तर कधी त्यांच्या पत्नी क्रांती रेडेकर या उत्तर देताना दिसत आहेत.
रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा सुपडा साफ; जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा वरचष्मा
आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांच्यात आणि डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. आर्यन खान प्रकरण हे निव्वळ बनाव होते आणि खंडणी मागण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी हा सर्व खेळ केला आहे असा आरोप नवाब मलिक यांनी मागच्याच आठवड्यात केला होता. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे काहीसे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याकडून सध्या सुरु असलेल्या ५ प्रकरणांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात आल्यामुळे काढून घेण्यात आला आहे.
Read Also :
- कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
- माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड
- नाराज विनोद तावडेंचं भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रमोशन; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
- कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर