मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरण सुनावणीत असतांना ठाकरे गट शिंदे गटावर तुटून पडतांना दिसत आहे. अनेक जाहीर कार्यक्रमातून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडलं जात आहे. यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे.
निवडणुक चिन्ह आणि शिवसेना नाव गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलचे सक्रीय झाले आहेत. त्यांची अलिकडेच खेड येथे जाहीर सभा पार पडली. त्या सभेत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच त्यांची आता मालेगाव येथे २६ मार्चला विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात जाहीर सभा झाली होती. लोकांची प्रचंड गर्दी पाहून शिंदे गटात मोठी धुसफुस दिसून आली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टिका केली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोळीबार मैदानावर जाहीर सभा होत आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहे.
Read also
- हेही वाचा….पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?
- हेही वाचा….शिवसेना अन् धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगाचं कोर्टाला पत्र, उद्धव ठाकरेंच्या टिकेवर उत्तर
- हेही वाचा….“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा….“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं
- हेही वाचा….जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय