रियाने इन्टाग्रामवर सुशांतसिंह राजपूत आणि तिचा फोटो शेअर करत लिहिलं की, “अमित शाह सर, मी सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या मृत्यूला आता एक महिना झाला आहे. “मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. तरीही न्यायासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी. मला केवळ हे जाणून घ्यायचं आहे की सुशांतने कोणत्या दडपणाखाली हे टोकाचं पाऊल उचललं.”
रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘मी आत्महत्या केली नाहीतर माझ्यावर बलात्कार करण्यात येईल आणि माझी हत्या करण्यात येईल. परंतु, मानु राऊत तुला जराही जाणीव आहे की, तू किती गंभीर गोष्ट म्हणाली आहेस. हादेखील गुन्हा आहे. कायद्यानुसार, कोणालाही हे करण्याचा अधिकार नाही. अशाप्रकराचं शोषण आता सहन नाही केलं जाऊ शकत. आता खूप झालं.’