अहमदनगर : रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नाही असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती मात्र त्यानंतर आता रोहित पवार यांनी पडळकर यांना आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी पाडळकरांना लगावला आहे.
पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत असे देखील यावेळी रोहित पवार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हंटले आहेत.
काय म्हणालेत नेमकं रोहित पवार यावेळी
आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय… ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका.
राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा…. तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा.
मित्र म्हणून आपल्याला शुभेच्छा.
माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल….. https://t.co/nlISxVO1IO pic.twitter.com/bzS43ZLypJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 10, 2020
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर नेमकं
रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात.
रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे.
Read Also
त्या 80 हजार बनावट खात्यांमागे भाजपचा हात, हसन मुश्रीफ यांचा आरोप
https://t.co/5hhVyr4n7p#HasanMushrif #NCP— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020