देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे. कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांची सेवा करत आहेत. रोहित पवार यांनी आज पुण्यातील ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
सणांवर देखील कोरोनाचं सावट आहे. अशा परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील बहिणींकडून रोहित पवार यांनी राखी बांधून घेतली आहे. “आपल्या अनेक भगिनी राज्यभरात कोविड योद्धे म्हणून काम करतात. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं आज प्रतिनिधीक स्वरूपात ससून आणि नायडू हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली” असं ट्विट ही रोहित पवार यांनी केलं आहे.
आपल्या अनेक भगिनी राज्यभरात #कोविड योद्धे म्हणून काम करतात. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं आज प्रतिनिधीक स्वरूपात ससून आणि नायडू हॉस्पिटलमधील #कोरोना वार्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. pic.twitter.com/p3tfeDyFOW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2020