नवी दिल्ली : लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टिट्यूचे प्रमूख अदर पुनावाला यांना देशातील काही बड्या नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याच वेळी ते लंडनला निघून गेल्याचे देखील समोर आले होते. अदर पुनावाला हे लंडनमध्ये असल्याने ते देश सोडून गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या अफवांवर अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी आणि माझा मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाहीत. आम्ही केवळ सुट्टीसाठी लंडनमध्ये आलो आहोत, असे सायरस पुनावाला यांनी म्हटले आहे. तसेच, या अफवा वेदनादायी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे सायरस पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.
सीरम आपले लस उत्पादन इतर देशात हलवणार असल्याच्या चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, अदर पुनावाला यांनी ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या असल्याचे म्हटले आहे.
Read Also :
- … अन्यथा मी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेल, पडळकरांचे अजित पवारांना पत्र
- काँग्रेस नेत्यांनी ट्विटर प्रोफाइल बदलत पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’
- … म्हणून पुण्यात आज लसीकरण पूर्णपणे बंद राहणार