पुणे : मनसे पुण्याच्या शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे लवकरच पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता स्वतः रुपाली ठोंबरेनी मौन सोडले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यातील प्रश्नांच्या बाबतीत मी त्यांची भेट घेत असते. उद्या मी शिवसेनेच्या नेत्याला भेटले तर तुम्ही लगेच रुपाली शिवसेनेत प्रवेश करणार असे म्हणणार का? असा उलट सवालही रुपाली यांनी उपस्थित केला.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास मी मनापासून काम करत आहे. अद्यापही पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय नाही. परंतु पक्षातील रिकामटेकड्या मंडळींचा होत असलेला त्रास, मला नवीन पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो. जवळचे हितचिंतकच माझ्याविरोधात पक्ष प्रमुखांचे कान भरू लागल्याचा आरोप रुपाली यांनी केला. ठोंबरेंच्या आरोपानंतर मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे .
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी महिलांना टार्गेट करण्यात आले आहे. तसेच मझ्यासोबतही घडत असल्याचे त्या म्हणल्या. मला पक्ष बदलायचा असता तर तो मी २०१७ ला भाजपची खुली ऑफर असतानाच बदलाला असता. त्यानंतर २०१९ ला माझे तिकीट कापण्यात आले तेव्हाही मी पक्ष बदलाचा निर्णय घेऊ शकले असते. पण मला तसे काहीच करायचे नव्हते .
‘शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक झाली तर वावगं काय?’ आव्हाडांचा रोखठोक सवाल
पण आज पक्षातील हितचिंतकच मनसे प्रमुखांना माझ्या विरुद्ध करत आहेत. त्यांची नावे मला माहित आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावे नक्कीच जाहीर करणार, असेही रुपाली म्हणाल्या . तसेच यासंर्दभात आपण लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणल्या.
Read Also :
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना