उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात सोमवारपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. मात्र भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. अजित पवार असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू”, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला.
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्या, असं प्रत्युत्तर दिलं आहे.’बापट यांनी हीच हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विश्वासात न घेता पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती’, असं म्हणत टोला रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांना लगावला.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत गिरीष बापट यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, “गिरीश बापट यांनी हीच हिम्मत मोदींनी कुणालाच विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती.”
गिरीश बापट यांनी हीच हिम्मत मोदीजींनी कुणालाच विश्वासात न घेता जेंव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता तेंव्हा दाखवायला पाहिजे होती.#PuneFightsCorona@NCPspeaks @thodkyaat @MySarkarnama@MaxMaharashtra @maxwoman_ @MHD_Press @timesnowmarathihttps://t.co/dnJEtpdPc2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 11, 2020