मुंबई : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये बदल होताना दिसत आहे. आज महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.
आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकर यांनी महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदाची सुत्रे हातात घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चित्रा वाघ यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी चाकणकर या चित्रा वाघ यांच्या सहकारी म्हणून काम पाहत होत्या.
पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हातात घेतल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या जागी कुणाची निवड होते त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन आहे.
“सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
दरम्यान, मनसेला रामराम ठोकत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रूपाली पाटील यांच्याकडे धडाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याने या पदाची सुत्रे त्यांच्याकडेच जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यावर पक्षांकडून अद्यापही शिक्कामोर्तब करण्यात आला नाही. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीच्या कोणत्या महिला नेत्याकडे जाणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल
- ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला तर राजकारण सोडून देईन: अरविंद केजरीवाल
- “आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते..”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य