जगात थैमान घातलेल्या कोरोनावर रशियाची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरलेली होती. रशिया ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसी देण्याचे ध्येय ठेवले आहे .त्यामळे या महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. या लसीचा पहिला डोस डॉक्टर आणि शिक्षकांना देण्यात येणार आहे. अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांच्या माहितीनुसार ,या लिसींची क्लिनिकल चाचणी गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार तयार करून त्या पूर्ण झाल्या आहे . व आता त्याचे रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे.
रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार याच महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.एका इंग्रजी वर्तमापत्राने याविषयी माहिती दिली आहे. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणी मागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी सांगितले.