सोलापूर : महाराष्ट्रात राजकारणात सचिन वाझे पॅटर्नने खळबळ माजवून दिली होती. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अजूनही हे शांत होत नाही तेच सोलापुरात अजून एक सचिन वाझे पॅटर्न अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.
” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
सोलापूर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून महिन्याकाठी ६० लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची धक्कादायक माहिती एका स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आली आहे. या संदर्भात रीतसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृहविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
पुन्हा एकदा समोर आलेल्या या सोलापूर सचिन वाझे पॅटर्नमुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त हरीश जल यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात अवैध धंदे तेजीत असून त्याला सोलापूर शहर क्राईम ब्रांचचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. सोलापूर क्राईम ब्रांचमधील पोलीस उप निरीक्षक संदीप उर्फ सनी शिंदे हे सोलापूरचे ‘सचिन वाझे’ असून पोलीस हेडकॉन्स्टेबलअजय पाडावी हा त्यांचा खास मोहरा आहे. जर कोणी या दोघांविरोधात तक्रार केली तर एसीबीचे संजीव पाटील मदत करत असल्याचे आरोप होत आहेत.
33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
या स्टिंगमधील संवादानुसार आरटीआय कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी धक्कदायक आरोप पोलीस प्रशासनावर केले आहेत. या स्टिंगमधील संवाद हा कॉन्स्टेबल पाडावीचा असून क्लब सुरू करण्यासाठी २ लाख रुपये मागितले जात आहेत. शिवाय उपर वाले साहेब म्हणजे सिपी असा उल्लेख आहे. क्लब सुरू करण्यासाठी गिऱ्हाईक बनवून स्टिंग करण्यात आले होते.
Read also:
- उसाला दर नाही म्हणून विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन
- “कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
- “२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
- उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
- नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा