मुंबई : पवार साहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बॅंका हाणल्या. पण पवार साहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का ? अशी बोचरी टिका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. विशेष करून त्या व्यासपीठावर भाजपचे इतरही नेते होते. मात्र त्यांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. त्यावरून आता राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा…चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या टिकेनंतर लगेचच अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना फोन केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. त्यावर सदाभाऊ खोत यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त करत “कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार ; पण…. ?
हेही वाचा…“माधुरीताईंचा चौथा विजय हा रेकॉर्ड ब्रेक होईल”, पर्वतीत देवेंद्र फडणवीसांनी सभा गाजवली
हेही वाचा…भोरमध्ये चौरंगी लढत..! महायुतीत बंडखोरांचा सुळसुळाट
हेही वाचा…थेट आणि समोरासमोर भिडणारा भिडू ‘बच्चू कडू’..! राजकारणातील एक वेगळचं रसायन