मुंबई : गुरुवारी विधिमंडळात विधान परिषदेच्या सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांना केलेल्या मदतीबद्दल आणि इतरही काही गोष्टीबद्दल भाष्य केले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
“माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी भाषण करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार मानले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. सदाभाऊ खोत यांनी सांगितले की त्यांचे वडील हे काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात कॅन्सर आजारावर उपचार घेत होते. त्यावेळी सदाभाऊ खोत हे दुष्काळी भागातील दौऱ्यावर गेले होते.
कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
बुलढाणा, विदर्भ या ठिकणी दौरा करत असताना त्यांचे वडील हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. दुष्काळी यात्रा रद्द करण्यासाठी मी वडिलांना विचारले असताना त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर १५ दिवस मी दुष्काळी दौरा सुरूच ठेवला. त्यानंतर हॉस्पिटलमधून फोन आला आणि वडिलांचे ऑपरेशन झाले अशी माहिती देण्यात आली.
“महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
वडिलांचे ऑपरेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे माझ्याआधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. वडिलांची त्यांनी काळजी घेतली आणि वडिलांना शब्द दिला की तुमच्या मुलाला मी मंत्री करतो. मला देवेंद्र फडणवीसांचा खरंच आभारी आहे, त्यांनी मला जी काही संधी दिली काम करायची ती नक्कीच चांगली होती आणि त्यामाध्यमातून मी शेतकऱ्यांचे बरेचशे प्रश्न मार्गी लावू शकलो. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आली आणि त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे आज मुबलक पाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा देवेंद्रजींचे आभार मानून मी भाषण संपवतो असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
Read also:
- प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
- स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
- टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
- पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल