मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. वेतनवाढ, विलगीकरण या मुद्यांवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानासह राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आंदोलन पुकारले होते.
“ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी पगारवाढ केल्यानंतरही एसटी संपाची कोंडी काही करता फुटत नव्हती. असं असताना आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत काल रात्री एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी आणि संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मुद्यांवर चर्चा केली आणि अखेरीस एसटी संप मागे घेत आहोत असं अजय गुजर यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी संप कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण झाल्याशिवाय मागे घेतला जाणार नाही असं देखील स्पष्ट केलं आहे. यामुळे संपात उभी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत
दुसरीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना अध्यक्ष अजय गुजर यांनी म्हटलं आहे की विलगीकरणाच्या मुद्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत. मात्र हे सर्व न्यायालयात प्रविष्ट आहे. न्यायालायने निर्णय दिल्याशिवाय विलगीकरण शक्य नाही. या सर्व गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक, सामाजिक नसून होऊ नये यासाठी आम्ही एसटी संप मागे घेण्याची भूमिका घेत आहोत. ऍड. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे आणि आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल तर आम्ही आमचा वकील बदलून टाकू अशी भूमिका देखील अजय गुजर यांनी घेतली आहे. आता सदावर्ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध
- राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
- पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
- पेपरफुटी प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक