राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली आहे. अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली आहे.
हे पण वाचा,“शिर्डीत रोजच विश्वस्त मंडळ जाहीर होतंय, सरकारला वाटेल तेव्हा ते नेमणूक करणार” सुजय विखे
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याने साई संस्थान अध्यक्षपदाला मोठे महत्व आहे. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्ट गणपती देवस्थान चे अध्यक्ष पद शिवसेनेच्या बांदेकर यांच्याकडे आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीला आता काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान द्यावे लागणार आहे. दोन्ही काँग्रेसने याबाबत दावा ठोकलेला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी मुंबईत वेगवान हालचाली सध्या चालू असल्या कारणाने आता होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. येत्या मंगळवारी या प्रकरणी दाखल जनहित याचिकेची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी काही निर्णय घेणार की मुदतवाढीचा पर्याय निवडते हे पाहावे लागणार आहे.
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नवे मंडळ सुरु करण्याचा हालचाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियमात बसेल असे मंडळ निवडायचे आहे. शिवसेनेला शिर्डीच्या संस्थानापेक्षा मुंबईच्या सिद्धिविनायक देवस्थानात रस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आशुतोष काळे यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे तर काँग्रेस पक्षाकडून सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीने अध्यक्ष निवडला जाणार आहे. आता सत्यजित तांबे होणार की आशुतोष काळे याबाबत मुंबईमध्ये खलबतं सुरु आहेत.
हे पण वाचा
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन