मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढीस लागला,” असे विधान केल्यांनतर, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी, राज ठाकरे यांच्यावर, “राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आहे. त्यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही,” अशी बोचरी टीका केली.
यांनतर आता संभाजी ब्रिगेड आणि मनसे, त्यातही राज ठाकरे यांच्यातील वाद आणखीन चिघळताना दिसत आहे. गायकवाड यांच्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या ॲड. मनोज आखरे यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, “हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणावेत, आम्ही आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणू आणि जाहीर चर्चा घडवून आणावी,” असं खुलं आव्हान त्यांनी मनसे अध्यक्षांना दिलं आहे.
देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
तसेच, “सर्वांना माहिती आहे, तुमचा इतिहास दंगली घडवण्याचा आहे आणि आमचा दंगली शमवण्याचा आहे. तुम्ही दंगलीचे स्त्रोत पसरवणाऱ्या इतिहासाचे लेखन करणाऱ्या, तोतया बाबासाहेब पुरंदरेंसारख्या शाहिरांच्या विचारांचे वारसदार आहात आणि आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, प्रबोधनकार ठाकरे आणि आता पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचे वारसदार आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
दरम्यान, राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे आधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर राज्याच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे विधान केले यावर गायकवाडांनी राज ठाकरेंच्या टीका केल्यावर, मनसेकडून पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी, तुम्हला राज ठाकरे काय कळणार, लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू.” अशा इशारा दिला आहे.
Read Also :
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “चंद्रकांतदादा, जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द”, रुपाली चाकणकरांचा जोरदार वार
- महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, SIT नोंदवणार आमदार संजय राठोड यांचा जबाब
- न्यायालयच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचे पाचव्यांदा समन्स!