पिंपरी-चिंचवड : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी, ‘मराठा मार्ग’ मासिकामधील संपादकीय लेखात, आगामी निवडणुकांसाठी ‘भाजपसोबत युती हाच पर्याय’ असल्याचं म्हटलं. दरम्यान, त्यांच्या आश्चर्यकारक भूमिकेनंतर आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘खेडेकर यांनी मुखपत्रातून तशी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत भाजपकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये,’ असं ते म्हणाले आहेत.
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेड-भाजप युतीचे संकेत!
चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना, संभाजी ब्रिगेडच्या भाजपबद्दल बदलत असलेल्या भूमिकेवर भाष्य केलं. तसेच, यावेळी त्यांनी, ‘त्यांची ऑफर काय बघून निर्णय घेतला जाईल,’ असं सूचक विधान देखील केलं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही, ‘संभाजी ब्रिगेडच हे वक्तव असेल, तर स्वागतच आहे. या सरकारला आरक्षण राखता आलेलं नाही. हे आता लोकांना समजलं आहे,’ असं मत खेडकर यांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं आहे.
शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरण, राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध ८ हजार पानांचं आरोपपत्र
मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखात, संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी, ‘संभाजी ब्रिगेड-भाजपची युती हि सध्याच्या राजकारणाची गरज आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे ‘राष्ट्रवादीचं पिल्लू’ अशी अनेक वर्षे आमची हेटाळणी झाली. पण आता वेळ आली आहे, भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने या युतीचा विचार करावा. राजकारण हे राजकारणासारखं व्हावं आणि त्यासाठी आता भाजपचा पर्याय उरला आहे,’ असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र पोलीसांना काम करू द्या, उगाच कुणी राजकारण करू नये – दिलीप वळसे पाटील
तसेच, ‘संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी आम्ही स्वबळावर लढलो, पण मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्था वगळता लोकसभा-विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही. सध्या राजकारणात युती-आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे असं नाही, तर देशभरातही आहे. राजकारणातच तशी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे, हा पर्याय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तपासून पाहावा आणि दोन्हीकडून चर्चेअंती अजेंडा ठरवावा आणि पुढचं राजकारण करावं,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Read Also :
- केंद्र सरकारने आमचे ३० ते ३२ कोटी रुपये अगोदर द्यावे – अजित पवार
- ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस
- महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला? सुरेखा पुणेकर संतापल्या
- ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस
- मोदी आणि फडणवीस ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, आंदोलन केवळ नौटंकीसाठी – नाना पटोले