नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे पार पडले. त्यानंतर आज नाशिकमध्येही मूक आंदोलन होत आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील १५ आमदारांचा पाठिंबा आहे. यात विधानसभा आज, उपसभापती नरहरी झिरवळ, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यांसोबत खासदार डॉ भारती पवार, हेमंत गोडसे यांनी आपली भूमिका मांडली.
हे पण वाचा, “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
यावेळी संभाजीराजेंनी, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा लढा सुरु असून, समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलेल्यांचे स्वागत आहे. लोकप्रतिनिधींनी वातावरण गढूळ करण्यापेक्षा, समाजाला योग्य दिशा देणं गरजेचं असून, समाजाचा रोष निवारण करण्यासाठी सर्व लोकप्रनिधींनी पुढे यावं. जनतेचा आक्रोश, आणि वातावरण गरम करायला मला २ मिनिटंही लागणार नाहीत, पण आत्ता ती वेळ नाही आणि समाजाने त्यांचे म्हणणे मांडले आहे,” असं भाष्य करत त्यांनी सरकारला फटकारले आहे.
हे पण वाचा, “भुजबळ खुर्चीवर बसले आणि…”, नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात झाला गोंधळ
तसेच, “मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही, सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे बोलायला पुढे येणाऱ्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी, समाजाला आरक्षण कसे मिळून देता येईल, यावर तोडगा काढण्यासाठी पुढे यावं. या विषयावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसू नये. ३३८ (ब) व ३४२ (अ) द्वारे मागास आयोगाचा आधार घेऊन देखील आरक्षण दिलं जाऊ शकतं, पण त्यात बराच वेळ जाईल, त्यापेक्षा राज्य सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी आधी मार्गी लावाव्या,” असं वक्तव्य त्यांनी केलं.
हे पण वाचा, काही नेते ओबीसी, मराठा आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
यावेळी, “मराठा आंदोलनाच्या समन्वयकांची बैठक होईल आणि यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्याबद्दलची सगळी माहिती संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत दिली जाईल,” असं सांगत त्यांनी या आंदोलनाचा समारोप केला.
Read Also :
- …शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय; गोपीचंद पडळकरांचा दावा
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
- आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही; राऊतांचा भाजपवर पलटवार