उस्मानाबाद : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यात आता खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. ‘मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात. वडेट्टीवार खाजगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असं खळबळजनक वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. त्यात सत्ताधारी पक्षातली काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असं संभाजीराजे म्हणाले.एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
ते म्हणाले की, वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसी मधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया असे करू नका. वडेट्टीवार असं का वागत आहेत माहिती नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Read Also
राज्यातल्या लेकीबाळींच्या किंकाळ्या,आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का ? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल https://t.co/nSKmjEwUqj#ChitraWagh #BJP @ChitraKWagh
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020