मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच आणखी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. क्रूझ पार्टी प्रकरणातील एक व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख करत नवाब मलिकांनी पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना लक्ष्य केलं आहे.
शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिकांनी आत्तापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. तसंच, समीर वानखेडे यांच्यावरही धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिकांच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आजही नवाब मलिकांनी एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आहे.
Here are whatsapp chats between K P Gosavi and an informer which shows how they were planning to trap people who were going to attend the party on the Cordelia Cruise.
This is Sameer Dawood Wankhede's private army therefore he has a lot to answer pic.twitter.com/Et6VNrQefR— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
के. पी गोसावी याच्यासोबत झालेल्या संभाषणात खबरीने काशिफ खानच्या नावाचा उल्लेख केला आहे. असं असतानाही काशिफ खानची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. तर, काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत?, असंही त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या या ट्वीटमुळं पुन्हा एकदा हे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
Read Also :
- आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- ‘आधी तुरुंगातील जेवण घ्या’, अनिल देशमुखांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
- ‘आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात कोणती मिटिंग करत होते?, हा षडयंत्राचा भाग होता का?’
- चित्रा वाघ आमदार होणार? भाजपकडून विधानपरिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता