मुंबई : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबंग नेत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक डॉ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षस्रेष्टींकडे पाठवत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने पुणे शहरात मनसेला खिंडार पडले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस
यासोबतच रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पत्र देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहले. अतिशय भावनिक शब्दांचा आधार घेत त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. ‘राजसाहेब आपण कायम माझ्या हृदयात रहाल’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. रुपाली पाटील ठोंबरे या लवकरच महाविकास आघाडीतील एका घटकपक्षात दिसतील असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यांनी नुकतीच शिवसेना युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेना प्रवेशाच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' @Rupalipatiltho1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2021
ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मुंबई मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी यावर भाष्य केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की , ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ असं संदीप यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
- राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
- तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
- बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !
- मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार