देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रविवारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 9431 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 267 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. त्या एक धक्कादायक बाब म्हणजे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
खबरदारी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यमंत्री बनसोडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत एका दिवसात 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे. राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.