मुंबई : जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल सुरू झाले असून बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जुनी पेंन्शन योजना राबवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात तात्पुर्ता मार्ग काढताना ही योजना खोडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने थेट कर्मचाऱ्यांच्या इमानदारीवरच घाव घालण्याची सुरूवात केली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची लायकी काढत त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जुनी पेन्शन योजना राबवण्यात येईल का हे आता कर्मचार्यांच्या प्रमाणिकपणावरून ठरणार असेल तर हा निव्वळ सत्ताधाऱ्यांच्या आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न आहे. शिंदे-फडणवीस सरकारनकडून शेतकरी आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडलचं आहे. यात आता सरकारी कर्मचाऱ्यांचीही भर पडली आहे. असं म्हणत राष्ट्रवादीने संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Read also
- हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
- हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक
- हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा…उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा….पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?