राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत सत्तानाट्यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र सचिन पायलट यांचे समर्थन करणे काँग्रेस नेते संजय झा यांना महागात पडले असून, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
Shri Sanjay Jha has been suspended from the Congress Party with immediate effect for anti-party activities and breach of discipline. pic.twitter.com/TaT0gWbCc7
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 14, 2020
पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. या आधी देखील संजय झा यांना प्रवक्तापदावरून पक्षाने हटवले होते.
For five years Sachin Pilot gave his blood , tears, toil and sweat for the Congress party between 2013-18. The Congress came back from a wretched 21 seats to 100.
We just gave him a performance bonus. We are so meritocratic. We are so transparent.
— Sanjay Jha (@JhaSanjay) July 14, 2020
संजय झा यांनी ट्विट केले होते की, आधी ज्योतिरादित्य सिंधिया आणि आता सचिन पायलट, नंतर कोण ? यानंतर त्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थनात आणखी एक ट्विट केले की, 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100 वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच त्यांना कामगिरीचा बोनस दिला. आम्ही खूप पारदर्शक आहोत.
टिव्हीवरील कार्यक्रमात पक्षावर टीका केल्यानंतर अखेर त्यांचे निलंबन करण्यात आले.