पुणे : कोथरूड येथील अनघा आंबेतकर यांनी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या कोथरूड बाग या गृहप्रकल्पात २०१५ मध्ये निवासी बुक केली होती. ९९ लाख रूपये ७३ हजार रूपये किमतीच्या या सदनिकेसमोर त्यांनी १० नोव्हेंबर २०१५ पासून कंपनीला वेळोवेळी २१ लाख ३४ हजार ८१ रूपये दिले होते. मात्र सदनिकेच्या खरेदीबाबत कंपनीने ठरल्याप्रमाणे बांधकाम न केल्याने संजय काकडे यांचा पाय खोलात गेला. त्यानंतर आज तक्रारदाराला बोलून काकडेंनी पैसे परत दिल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात
कोथरूड येथे अनघा आंबेतकर यांनी संजय काकडे यांच्याकडे सदनिका बुकिंग केली होती. मात्र संजय काकडे यांनी त्यांची फसवणूक केली. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. यानंतर संजय काकडे यांच्याविरोधात अटक वॉंरट जारी करण्यात आले. याचा धसका काकडे यांनी घेतला असून त्यांनी तातडीने १६ लाख ३४ हजार ८१ रूपये व ९ टक्के व्याजाचे १२ लाख असे एकूण २८ लाख ३४ हजार ०८१ रूपयांचा धनादेश तक्रारदाराला परत केल्याची माहिती आहे.
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”
दरम्यान, आंबेतकर यांनी २०१७ मध्ये संजय काकडे यांच्या कंपनीकडे बुकिंग केली होती. मात्र काही काळानंतर ती बुकिंग रद्द करण्यात आली. त्यानुसार कंपनीने त्यावेळी त्यांना फक्त पाच लाख रूपये परत केले होते. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड विरोधात आयोगात अर्ज दाखल केला होता.
READ ALSO :
हेही वाचा..“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ?
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात”
हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे”