मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष बघायला मिळत आहे. केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब केले जात आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल
वारंवार केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांमुळे आता त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेने मुंबई शहर पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती केली आहे असं वारंवार भाजपकडून बोललं जातं आहे. संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी निवड झाल्यापासून वारंवार भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत अशी चर्चा भाजपच्या गोटातून समोर आली आहे.
अटकेपासून संरक्षणाची मागणी कोर्टाने फेटाळली; मुंबै बँक फसवणूक प्रकरणात प्रवीण दरेकरांचा पाय खोलात
दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर बँक फसवणुकीप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय पांडे यांची नियुक्ती खास भाजपला डॅमेज करण्यासाठी केली आहे अशी सद्य परिस्थिती देखील समोर आली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर लगेचच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांनी संजय पांडे यांची भेट घेतली आहे. याभेटीचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
आता शिवसेनेचं पुढचं टार्गेट कोण असणार ? याबाबत तर चर्चा झाली नसेल ना असं देखील अनेक नेत्यांकडून बोललं जातं आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पांडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?