मुंबई : काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, “मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. देशाला उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आहे आणि भविष्यात ती लागली, तर नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम आहेत आणि नक्कीच त्यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल,” असं वक्तव्य केलं होतं.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?,” असं म्हणत निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला असून, “कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं, म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही,” असा ‘रोखठोक’ टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली; विकास आराखडा लांबणीवर
“कोण काय बोलतंय, त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. माझं बोलणं आधी समजून घ्यायचं होतं. या देशात अनेक नेते असू शकत नाहीत का? भाजपमध्येही अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन हे नेते होते. त्याच काळात बाळासाहेब ठाकरे हे देखील मोठे नेते होते. त्यामुळे राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा नीट अभ्यास करून त्यांनी बोलावं,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
दरम्यान, काल संजय राऊतांच्या त्या विधानावर फडणवीसांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, “मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं राऊतांना वाटत असेल, तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्कीच राष्ट्रीय नेता व्हावं; पण राष्ट्रवादीला ते मान्य आहे का? त्यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत,” असं सांगत, “त्यांनी जी संधी घेतली आहे, त्याचं आता त्यांनी सोनं करावं,” असं ते म्हणाले होते.
Read Also :
- आघाडी सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त, पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर ; पडळकर यांची खोचक टीका
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: आरोपी जामिनावर बाहेर आले तरी वनविभागाची चौकशी संपेना
- अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र संकटात, नवी मुंबई महापालिकेने १ कोटी रुपयांची मदत करावी – आमदार मंदा म्हात्रे
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
- राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पण एका मतदारसंघासाठी केवळ एकच तास