मुंबई – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. उत्तरप्रदेश, गोव्यात आपलीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या विधानावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केल्यावर त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल की, देवेंद्र फडणवीस गोव्यात गेल्यावर भारतीय जनता पक्षही फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. प्रविण झांट्ये यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ती लढाई लढावी.”
संजय राऊत पुढे म्हणाले, आची लढाई गोव्यात खरोखर नोटांशीच आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या प्रकारे तिकडे नोटांचा पाऊस पाडत आहेत विशेष करुन महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चालल्या आहेत त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्याच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करेल की या नोटांच्या दबावाखाली येऊ नका.
राज्यातील पहिल्या उर्दू घराची ५ महिन्यांतच दयनीय अवस्था; चव्हाणांनी जनतेच्या ८ कोटींवर पाणी फेरले?
शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना पक्ष हा भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका तुमच्या नोटांशी आम्ही लढू असंही संजय राऊत म्हणाले.
Read also:
- प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव; भाजप नेते आवाज उठवणार?
- “मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र
- शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; शशिकांत शिंदेंचे शिवसेना आमदाराला प्रत्यूत्तर
- शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नसणार; कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रवक्ते नवाब मलिकांची घोषणा
- शरद पवार पंतप्रधान कधी होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर कधी पडणार? हेही सांगा – चंद्रकांत पाटील