बंगळुरू : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 29 आाकड्याची मॅजिक फिगर ओलांडली आहे. भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता. भाजपच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं आहे. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.
‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. 58 प्रभागात 385 उमेदवार आपलं नशीब आजमवत होते. त्यापैकी जवळपास निम्म्या जागांवरचा निकाल जाहीर झाला आहे. तर पुढच्या काही तासांत उर्वरित जागांचा निकाल हाती येईल.
पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव महानगरपालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने वाचचाल सुरू झाली आहे. आता पर्यंत 22 उमेदवार विजयी तर 9 ते 10 उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव महानगरपालिकेसाठी 29 ही आहे मॅजिक फिगर आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे.
बेळगाव निवडणूक अपडेट (आतापर्यंत)
महाराष्ट्र एकीकरण समिती : 3
भाजप : 30
काँग्रेस : 4
अपक्ष : 5
एमआयएम : 1
कोणत्या वॉर्डात कुणाचा विजय?
वार्ड 23 जयंत विजयी भाजपा विजयी (शहापूर)
वार्ड 30 – नंदू मिरजकर भाजपाचे विजयी
वार्ड 41 – भाजपा मंगेश पवार विजयी
वार्ड 52 :- खूर्षीद मूल्ला काँग्रेस विजयी
वार्ड 38 – महंमद पटवेगार – विजयी
वार्ड 1 : इक्रा मुल्ला – विजयी – अपक्ष
वार्ड 4 – भाजपाचे जयतीर्थ सवदत्ती विजयी
वार्ड 27 : रवी साळुंखे विजयी (अपक्ष)
वार्ड 29 : भाजपाचे नितीन जाधव विजयी
वार्ड 2 : मुजम्मील डोणी – विजयी – काँग्रेस – मुजम्मील डोणी तिसर्यांदा विजयी – 1600+ मतांनी विजयी
वार्ड 16 – भाजपाचे राजू भातकांडे विजयी
वार्ड 15 : भाजपा विजयी – सौ. नेत्रावती भागवत – 1285 मतं पडली – 142 मतांनी विजयी (महाद्वार रोड)
वार्ड 3 : काँग्रेस विजयी – ज्योती कडोलकर (माळी गल्ली, कामत गल्ली)
वार्ड 14 : शिवाजी मंडोळकर – विजयी – समिती
वार्ड 11 : समीवुल्ला माडीवाले – काँग्रेस
वार्ड 40 : रेश्मा कामकर – भाजपा – विजयी
वार्ड 18 : शाहीदखान पठाण – विजयी – एमआयएम
वार्ड 16 : भाजपा राजू भातकांडे – विजयी
Read Also :
- करुणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तूल प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया… काय म्हणाले…
- शरद पवार यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ – गुणरत्न सदावर्ते
- वसंतदादा पाटीलांचा विश्वासघात करून पवारसाहेब आघाडीतून कसे बाहेर पडले? -भाजप
- समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
- “राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले