मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, राऊत अचानक पवारांच्या भेटील आल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड
संजय राऊत हे काही वेळापूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी राऊत चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. या भेटीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या संदर्भातही पवार राऊतांकडून माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही बैठक किती वेळ चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, एसटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी वाढल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात या संदर्भात बैठक झाली. यावेळी विलीनीकरणापासून ते सरकारवर येणाऱ्या आर्थिक बोझापर्यंतच्या बाबींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत.
Read Also :
- आटपाडी राडा प्रकरण भोवणार?; अटकेपासून वाचण्यासाठी पडळकरांची उच्च न्यायालयात धाव
- ‘शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक झाली तर वावगं काय?’ आव्हाडांचा रोखठोक सवाल
- सातारा जिल्हा बँकेत दोन दिग्गज नेत्यांचा निसटता पराभव; आमदार शशिकांत शिंदे, राज्य गृहमंत्री देसाई थेट पराभूत
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
- परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा