शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केलं आहे. भूमिपूजनाआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंदिराच्या घुमटावर ‘श्रीराम – बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती’ असे लिहिलेला फोटो राऊत यांनी शेअर केला आहे. या फोटो खाली ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असेही लिहिले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 5, 2020
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत.