मुंबई : उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर, दिवाकर रावते आणि अन्य आमदार, खासदार वर्षा बंगल्यावर तासन् तास वाट पाहत असायचे. परंतु उद्धव ठाकरे त्यांना भेट देत नसत. भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांवर कायम अन्याय झाला असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. मग मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट देऊन त्या अडीच वर्षात अजित पवारांनी अर्थमंत्री असतांना शिवसेनेच्या आमदारांना किती पैसे दिलेत. ? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी देखील राऊतांवर टिका केली आहे.
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…
नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. तिला बघायला लोकांना जस आवडतं. तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात. असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दुर केला पाहिजे. गौतमी पाटीलल विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊतांना पाठवून दे. असं सांगतानाच आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये. अशी टिकाही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
नितेश राणेंनी संजय राऊतांना गौतमी पाटील म्हणू नये. गौतमी पाटील ही प्रसिद्ध आहे. ती लोकांची करमणुक करते. पम हा माणुस सकाळी उठून लोकांंचं डोकं खराब करतो. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज होतो. संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात. ही संजय राऊतांची लोकप्रियता आहे. गौतमी पाटील आणि संजय राऊतांची तुलना होऊ शकत नाही. संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार छोटे आहेत. असंही शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”