मुंबई: नवनर्वाचित सहकारमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील बहुचर्चित भेटीवर शिवसेनेने सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांनी शाहा यांची भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यानंतर या विषयावर अधिक बोलणे संजय राऊत यांनी टाळले.
हे पण वाचा: ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
राऊत म्हणाले की, यावेळी त्यांनी केंद्र सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली. अमित शाह राष्ट्रीय आपत्ती निवारणासंबंधीचे निकष बदलण्याचे काम करतील, अशी आशा आम्हाला आहे. आम्ही केंद्र सरकारकडे पॅकेज मागत नाही. पण जेवढी मदत गरजेची आहे, तेवढी दिली जावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
हे पण वाचा: केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल (दि.३) दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीत सहकार विषयाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सहकार खाते नव्याने निर्माण केले आहे. या नव्या विभागाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे सोपवली आहे. सहकार हा विषय राज्यांशी संबंधित आहे मात्र केंद्राने हे नवं खातं तयार केल्यानं देशव्यापी सहकार क्षेत्र या विभागातंर्गत येणार आहे.
हे पण वाचा: राहुल गांधींच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी‘मध्ये दिला गेला, ‘एकी हेच बळ’चा नारा
मात्र अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत भेट होत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शहा-पवार भेटीत नेमकं काय घडेल आणि त्याचा भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगणं आत्ता कठीण आहे. परंतु येणाऱ्या काळात सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…