मुंबई : निवडणूक आयोगाने, राज्यसभेच्या महाराष्ट्रा सह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश अशा एकूण सहा रिक्त जागांवर पोटनिवडणूका होणार आहेत, तर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडून, त्याच दिवशी निकाल देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगतिले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राजीव सातव यांची जागा रिक्त झाल्याने त्यांच्याकडून उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागलेले असताना, भाजपने आपला उमेदवार जाहीर करून काँग्रेसला आव्हान दिले आहे.
राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी? तर्कवितर्कांना उधान
आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी याबद्दलचा सस्पेन्स संपवून, भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. ‘संजय उपाध्याय हे आमचे मुंबई भाजपचे सरचिटणीस, राज्यसभेचे उमेदवार असतील. २२ ला सकाळी ते फॉर्म भरायला जातील,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, उमेदवार देऊन भाजपने ही निवडणुकही चुरशीची बनवली आहे.
राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, कोण घेणार सातव यांची जागा?
दरम्यान, राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेले संजय उपाध्याय हे, भाजयुमोपासून राजकारणात असून, काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. त्यांनतर त्यांच्याकडे भाजप मुंबई सरचिटणीस पद देण्यात आले. उपाध्याय यांचा उत्तर भारतीयांमध्ये मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच, ‘या’ नेत्यांची नावे आघाडीवर
ज्या राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश असून, म.प्रदेशातील एका जागेचा, प.बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील २ रिक्त जागांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
Read Also :
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या