मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंच्यावर, त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी गंभीर आरोप केले असून, काळे यांच्याकडून घरगुती हिंसाचार, तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची तक्रार त्यांनी, नेरुळ पोलीस ठाण्यात केली आहे. त्या आधारे त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता गजानन काळे हे फरार आहेत आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे
या पार्श्वभूमीवर आता गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी यांनी, ‘राज ठाकरेंच्या कृष्णकुंज’ या बंगल्यावर जाऊन, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर आपली सर्व कैफियत मांडली आहे. यांनतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “शर्मिला वहिनींनी माझं म्हणणं ऐकून घेतलं असून, त्या मला नक्की न्याय देतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मी प्रबोधनकार पण वाचलेत आणि यशवंतराव पण – राज ठाकरे
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असल्याने संजीवनी यांना त्यांची भेट घेता आली नाही. ते शनिवारी रात्री मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, शर्मिला ठाकरे यांच्यासमोर सगळी बाजू मांडल्यानांतर, शर्मिला ठाकरेंनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. “राज ठाकरे घरी परत आल्यावर, त्यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे माहिती मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता यांनी दिली आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवार उत्तरले, म्हणाले…
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी संजीवनी काळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. तसेच, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दर्शविला होता. नवी मुंबईतील नागरिकांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास महिला आघाडीने देखील याप्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेऊन, गजानन काळे यांना लवकरात लवकर अटक केली जावी, अशी मागणी केली आहे.
Read Also :
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल
- २५० कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार; अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण