मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रार केली असून, नेरुळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांच्याकडून घरगुती हिंसाचार, तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे आणि विवाहबाह्य संबंध असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार काळे यांच्याविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन काळेंच्या पत्नीचा गौप्यस्फोट, पोलिसांकडून माझ्यावर सेटलमेंटसाठी मानसिक दबाव
दरम्यान, आता त्यांच्या पत्नीने आता फरार गजानन काळे यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि योग्य तो न्याय मिळावा यासाठी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेऊन, त्यांच्यासमोर सगळी कैफियत मांडून, फरार गजानन काळेच्या अटकेसाठी साकडे घातले आहे. त्यांनी आठवलेंच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
संजीवनी यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनंतर, गेल्या ६ दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची १० पथके काळे यांचा शोध घेत आहेत. ते लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी, महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून, गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली आहे.
या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली, आघाडी सरकारकडून जनतेची फसवणूक सुरु
दुसरीकडे या प्रकरणाला पत्नी संजीवनी काळे यांच्यामुळेच राजकीय वलय प्राप्त झाले असून, त्यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडे आधी न्यायाची मागणी केली होती. त्यावर वाघ यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात हा विषय लावून धरला आहे. तसेच, नवी मुंबईतील नागरिकांनीही संजीवनी यांना पाठिंबा दिला आहे. त्यातच पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप, संजीवनी यांनी केल्यावर एकच खळबळ उडाली आहे.
Read Also :
- सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
- बैलगाडा शर्यत चालू करा; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
- …तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार