सातारा : सातारा जिल्हा बँकेचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा बँक ही अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्ग्ज नेत्यांच्या लढाया बघायला मिळाल्या होत्या. यामध्ये दस्तुरखुद्द मंत्र्यांचा पराभव देखील झाल्याचे चित्र समोर आले आहे.
पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
यामध्ये एक पराभव हा कार्यकर्त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला तो म्हणजे जावळी सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदेंचा झालेला पराभव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेळेप्रसंगी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंह राजेंसह अनेकांना अंगावर घेणारे आमदार शशिकांत शिंदे हे एकनिष्ठ कार्यकर्ते असताना त्यांचे वाढते राजकीय वजन कमी करण्यासाठी मुद्दामून पराभव घडवून आणला का ? अशी शंका त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. काल निवडणुकीचा निकाल लागला आणि शिंदे हे अवघ्या एका मताने पराभूत झाले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच पक्षाचे कार्यालय फोडून संताप व्यक्त केला. पाच कार्यकर्त्यांना अटकही झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांनी लगेचच शशिकांत शिंदे यांची भेट घेण्याचे ठरवले आणि त्यांच्यासोबत बोलणे केले.
अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आणि पुढील राजकीय भवितव्य याबाबत शशिकांत शिंदे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनीच संकते दिले आहेत. ‘मी २५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीबाबत मी बोलेन आणि माझी भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करेन’, असे शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबतची बैठक आटोपल्यानंतर माध्यमांना सांगितले.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
यासोबतच त्यांनी हेही म्हटलं आहे की मला सांगा की आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार आहेत. त्या हिशोबाने आगामी काळात मला राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार तालुक्यात करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार का ? हे विचारल्यावर त्यांनी म्हटलं आहे की मी मरेपर्यंत शरदचंद्र पवार साहेबांची साथ सोडणार नाही. सातारा जिल्ह्यात आता मी मोकळाच आहे असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
Read Also :
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना
- “महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या