कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ (जिल्हा दूध उत्पादक संघ) ची निवडणूक नुकतीच झाली. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील गटाचा १७-४ असा धुव्वा उडवत गोकुळवर सत्ता स्थापित केली. तब्ब्ल ३० वर्षानंतर सत्तापालट करण्यात विरोधी गटाला यश आले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या कारभाराची झाडाझडती घेतली आहे.
वर्षभरात गोकुलमध्ये २७८ कोटी रुपयांची खरेदी, वासाचे म्हणून बाजूला निघणारे दोन लाख लिटर दूध, नऊ हजार रुपये दर असताना १२ हजार रुपये टन खर्च करून मोलॅसिसची खरेदी, ठेकेदार पद्धतीने ८०० कामगार, मोठ्या प्रमाणात पॉली फिल्मची केलेली खरेदी, वारणा दूध संघपेक्षा टँकरला फेरीमागे चार हजार रुपये जादा देऊन केलेली पैशांची उधळपट्टी चालू असताना गोकुलमधील अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती की काय असा संतप्त सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूधसंघाच्या झालेल्या पंचनामा बैठकीत विचारला आहे.
हे पण वाचा गोकुळचे नवीन संचालक: दिग्ग्ज नेत्यांचे वारस ते सर्वसामान्य कार्यकर्ते
गोकुळच्या अवास्तव होणाऱ्या खर्चावरून कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांना दोन मंत्र्यांनी अक्षरशः धारेवर धरले आहे. यापुढं असा भोंगळ कारभार दूध संघात चालणार नाही, कारभारात एकतर सुधारणा करा अन्यथा घरचा रास्ता तुमच्यासाठी खुला आहे असे घाणेकर यांनी म्हटले आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भाड्यापोटी अतिरिक्त पैसे देऊन गोकुळला लुबाडले आहे आणि आता हे भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. यापुढे हे सगळे प्रकार बंद करा आणि विश्वस्त म्हणून आपल्याला एकत्रित येऊन आपल्याला काम करावे लागणार आहे अशा शब्दांत दोन्ही मंत्र्यांनी गोकुळच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
हे पण वाचा गोकुळच्या सत्ता परिवर्तनाचा आढावा: तब्ब्ल ५०० च्या वर ठरवधारक एकाच वेळी आणून बंटी पाटलांनी…