कोल्हापूर – महाराष्ट्रात मागील आठवड्यात ६ विधानपरिषदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापुरातील लढतीकडे महाराष्ट्रातील सर्वांचेच लक्ष लागले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात संघर्ष होणार होता मात्र जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनी यामध्ये मध्यस्ती केल्याने हा संघर्ष वेळीच टळला.
सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत विधानपरिषदेची लढाई बिनविरोध जिंकली. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या उमेदवारीचा शड्डू ठोकला होता. जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.
चीनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी आत्ताच सावध व्हा; शिवसेनेचा केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला
गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बाजी मारली आहे. या गटातून सतेज पाटील यांच्यासोबत दोन जणांनी डमी अर्ज भरले होते, मात्र त्यांची अर्ज मागे घेण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. जिल्हा बँकेसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत होती.
गगनबावडा संस्था गटात ६६ ठरावधारक असून, सतेज पाटील यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत थेट ४६ ठरावधारक सोबत आणून जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होईल असे म्हटले जात होते. त्यानुसार त्यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली.
चिंता वाढली: दक्षिण अफ्रिकेतून मुंबई विमानतळावर आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह
गगनबावडा तालुका संस्था गटात याआधी पी. जी. शिंदे यांचे प्रभुत्व होते. मात्र, शिंदे यांनी यावेळी अर्ज दाखल केला नाही. गगनबावडा संस्था गटातून काल खोपडेवाडीच्या महादेव केशव पडवळ आणि पळसंबेच्या दीपक पांडुरंग लाड यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही ठरावधारक हे बंटी पाटील गटाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली होती. आज ही औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि बंटी पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे.
Read Also :
- सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती