कोल्हापूर: गोकुळ निवडणूक निकाल Gokul election results महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता कोल्हापूर मधील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्हातील पारंपरिक वैरी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत.बंटी पाटील-मुश्रीफ गटाने गोकुळच्या रणांगणात बाजी मारण्यास सुरवात केली होती. आता सर्व फेऱ्यांचे निकाल हाती लागले आहेत आणि बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने गोकुळ ची सत्ता मिळवत परिवर्तन घडवून आणले आहे.
शेवटच्या फेरीच्या मतमोजणीनंतर तब्ब्ल तब्ब्ल १७ जागांवर विरोधी गट म्हणजेच पाटील-मुश्रीफ गटाने विजय मिळवत गोकुळची सत्ता खेचून आणली आहे. खुल्या प्रवर्गात तब्ब्ल १३ जागांवर पाटील-मुश्रीफ गटाने विजय मिळवलेला आहे तर ३ जागांवर सत्ताधारी गटाने विजय मिळवला आहे. तब्ब्ल २५ वर्षांची पाटील-महाडिक गटाची निर्विवाद सत्ता उधळून लावण्यात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला यश मिळाले आहे. महाडिक गटाने यावेळी देखील गोकुळची निवडणूक लावून धरली होती.
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची निवडणूक आता अखेर संपुष्टात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन झालेले होते. बायजी शेळके,सूचित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर, नावेद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, शौमिका महाडिक,चेतन नरके, अम्ब्रिशसिंह घाटगे, हे या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे. Satej Patil’s Rajshri Shahu Shetkari Aghadi panel wins Kolhapur Dudh Sangha Gokul election