मुंबई : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमळाबाई प्रकरणावरून चांगलाच वाद पेटला आहे. शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपवर कमळाबाईचा उल्लेख करीत निशाणा साधला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजप शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला आता पेग्विंन सेना म्हणायचे का ? असा सवाल केला आहे. आता शिवसेनेच्या आणि भाजपच्या लढाईत राष्ट्रवादीने उडी घेतली आहे.
एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटवर सत्यवचन असं म्हणत भ्रष्टाचाऱ्यांची आई कमळाबाई असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेच्या या लढाईत राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार त्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.
“तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
मराठी माणसाला आपापसात लढवलं जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते, अशी टिका सामनातुन करण्यात आली होती. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आठवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय ? नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार शिवसेनेला प्रतुत्तर दिलं आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
दरम्यान, शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत भाजपचा उल्लेख कमळाबाई केला आहे. अमित शहा यांंच्या मुंबई दौऱ्यावरून देखील त्यांनी भाजपवर टिका केली आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
!! सत्यवचन !!#भ्रष्टाचाऱ्यांची_आई_कमळाबाई
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) September 4, 2022
Read also
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा