पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यात वसंत मोरे यांची शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यांनतर आता पुणे मनसेत गळतील सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर मनसेला आता मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेविरोधात जाहीरपणे भाष्य केल्याने वसंत मोरेंचे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर वसंत मोरेंना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संभ्रम नाही, मात्र लोकप्रतिनिधी या नेत्याने माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे.
कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
या सर्व प्रकारानंतर वसंत मोरे यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून पक्षात येण्याच्या ऑफर्स आल्या आहेत. शिवसेनेचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी फोन करून वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही वसंत मोरेंशी संपर्क साधला आहे. रुपाली ठोंबरे यांनीही राष्ट्रवादीत येण्यासाठी मोरेंना खुली ऑफर दिली होती.
संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
हे सर्व सुरु असताना पुण्यातील काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केल्याने आता ,मनसेत खळबळ उडाली आहे. काल साईनाथ बाबर यांची मनसेच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज लगेचच राजीनामा नाट्य सुरु झाल्याने उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. मनसे शाखाअध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.
वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादाच्या आणि भोंगे हटविण्याच्या भूमिकेमुळे पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. वसंत मोरेंना सध्या पाहता येणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या ऑफर्स बघता ते किती दिवस मनसेत अजून टिकू शकतात याबाबतही मनसेत संभ्रम आहे. आगामी काळात होणाऱ्या घडामोडींवर मनसेचे भवितव्य कसे असेल ? हे आता लवकरच कळू शकते.
Read also:
- ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
- माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
- 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
- राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
- यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई