मुंबई : मुंबईतील इशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील विरूद्ध मिहिर कोटेजा अशी लढत होत आहे. यातच आता या मतदारसंघात भाजपकडून करोडो रूपये वाटले जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. यावेळी दानवे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पैसे वाटल्याचा आरोप केलाय.
हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे”
भाजपने इशान्य मुंबईत करोडो रूपये वाटले आहेत. हे पैसे शिवसैनिकांनी पडकल्यानंतर ते पळून गेलेत. याला निवडणुक आयोगाचे लोक तसेच पोलिसांनी देखील अप्रत्यक्षपणे मद केलीय. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याठिकाणी येऊन गेले आहेत. मोदींनी देखील याच मतदारसंघात रोड शो केला होता. त्यावरून त्यांना कळून चुकलं आहे की आम्ही याठिकाणी हारतो आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यातच भाजपकडून जो पैसे वाटण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्याची रितसर राज्य निवडणुक आयोग तसेच राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्रीच अशा लोकांना पैसे वाटप करण्याचे सरंक्षण देत असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्था कसा चालयचा ? असा सवाल देखील दानवेंकडून करण्यात आलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला
हेही वाचा..“भाजपला आता संघाची गरज उरली नाही”, जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत
हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश
हेही वाचा..“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ?
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात”