अमरावती : मोदीला मी मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं वक्तव्य करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. भाजपमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनीही नाना पटोले यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मालकिनीला खुश करण्यासाठी नाना पटोलेंनी मोदींवर टीका असल्याचं ते म्हणाले.
दुसरीकडे, नाना पटोले यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नसल्याची सारवासारव केली आहे. मी मोदी म्हणून तिथल्या एका गावगुंडाबाबत बोललो असल्याचं पटोले म्हणाले. एकंदर नाना पटोले तोंडघशी पडल्याचं दिसून येत आहेत.
पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
मोदींविरोधात बोलण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. मालकिनिला खुश करण्यासाठी नाना पटोले हे भुंकत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना बोंडे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करणे बंद करावं. नानांसारख्याच गमजा मारण्याचं काम करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोट इथल्या महाराष्ट्रात छाटली गेली होती, असा इशाराही त्यांनी नाना पटोले यांना दिला.
मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत – संजय राऊत
नाना जर अशा गमजा मारत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावं, ते ज्या पंजाच्या भरोशावर बोलत आहे, तो पंजाब सुद्धा छाटला जाईल. महाराष्ट्रातले तरुण पेटले असून नाना आपल्या मर्यादेत राहावं, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
Read also:
- पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
- सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले – अमृता फडणवीस
- भाजप आमदाराचा निष्काळजीपणा; कोरोना पॉझिटीव्ह असताना आंदोलनात सहभाग
- नाना पटोलेंना मोदींबद्दलच वादग्रस्त वक्तव्य भोवणार? भाजपची पोलिसांत तक्रार दाखल