श्रीगोंदा: नागवडे बापूंच्या विचारांना आणि संस्काराला तडा जाऊ देणार नाही तसेच सर्वसामान्य जनतेची बांधिलकी स्वीकारून यापुढील काळात कारखान्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ गाळप हंगामाच्या मिल रोलर पूजनाप्रसंगी ते सभासदांशी बोलत होते. यावेळी राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, उपाध्यक्ष युवराज चितळकर यांच्या हस्ते कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन करण्यात आले.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
नागवडे म्हणाले की कोरोना महामारीच्या संकट काळात जनतेला मदत करण्यासाठी नागवडे कारखाना हा इतरांच्या तुलनेत अग्रेसर ठरला. श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावाला १० हजार रुपये, नगरपालिकेला ५० हजार रुपये अशी कारखान्यांमार्फत मदत करण्यात आली. श्रीगोंदा येथे कोविड रुग्णांच्या सेवेसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन यंत्रणा व बायटॅप देण्यात आले. गोरगरीब जनतेच्या सेवेकरिता अन्नदान देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
येणाऱ्या पुढील गळीप हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे आणि नागवडे कारखाना आपले हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करणार असा विश्वास देखील कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अरुण पाचपुते, संचालक सुभाष शिंदे, विजय कापसे, शरद खोमणे, सचिन कदम, ऍड. सुनील भोस, अंजली रोडे, सुरेखा लकडे, विश्वनाथ गिरमकर, प्राध्यापक सुनील माने, विलासराव काकडे, श्रीनिवास घाटगे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन भाऊसाहेब बांदल यांनी केले.
हे पण वाचा,
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन