मुंबई : महाराष्ट्राची सत्ता या आघाडीच्या हातात दिल्यानंतर ‘कृषी समृद्धी योजना’ ही राबवली जाईल. या योजनेमध्ये ३ लाख रुपये पर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचे माफ केले जाईल आणि जो नियमित कर्जफेड करतो त्याला ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत केली जाईल. या शेतकऱ्याला सन्मानाने जगायची संधी दिली जाईल. हा शेतकरी बळीराजा आहे, तुमची-माझी भुकेची समस्या सोडवणारा आहे. आत्महत्या सारख्या संकटाला जाण्याची दुःखाची परिस्थिती त्याच्यावर आलेली आहे. असे अश्वासन शरद पवार यांनी मतदारांना दिले. मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…भोरमध्ये चौरंगी लढत..! महायुतीत बंडखोरांचा सुळसुळाट
भाजपाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या दुःखाकडे ढुंकवून सुद्धा बघितलं जात नाही. त्यामुळे याला काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे. त्या उत्तरासाठीच आम्ही लोकांनी हे आश्वासन, हे धोरणात्मक कार्यक्रम आपल्या सर्वांसमोर मांडला. माझी खात्री आहे की, बळीराजाला वाचवण्यासाठी या ठिकाणी हे आघाडीचं सरकार यावं हा आमचा आग्रह आहे, त्याला तुम्हा सर्वांची मदत मिळेल. महाराष्ट्राचे हे चित्र बदलून एक प्रगतीशील, सामान्य माणसाचे दुःख कमी करणारं, महागाईतून सुटका करणारं, बेरोजगारी घालवण्यासाठी हातभार लावणारं, स्त्रियांना संरक्षण देणारं आणि दिन- दलित, आदिवासी, उपेक्षित यांना सन्मानाने जगता येईल, अशा प्रकारची काळजी घेणारे सरकार आम्ही लोक आपल्याला देऊ. असा विश्वास देखील त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…थेट आणि समोरासमोर भिडणारा भिडू ‘बच्चू कडू’..! राजकारणातील एक वेगळचं रसायन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज माझ्याकडे ज्या काही ५ गॅरंटी आपण सांगितल्या. त्याच्यामध्ये कृषी संदर्भाची गॅरंटी आम्ही देत आहोत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, माझ्याकडे देशाचं शेती खातं होतं. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती, कर्जबाजारीपणा होता. आम्ही लोकांनी एकत्र बसून देशातील शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला १२ टक्के व्याजाचा दर होता, तो १२ वरुन ६ टक्क्यांवर आणला, ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणला आणि त्यांना आणखी सवलत दिली.
महाराष्ट्र राज्य एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी अत्यंत मोलाची कामगिरी करणारं राज्य. आज स्त्रियांवर अत्याचार त्याची संख्या वाढली. त्याची आकडेवारी पाहिली तर चिंता वाटावी अशा प्रकारचे चित्र आहे. राज्यामध्ये ६४ हजार महिला आणि मुली आज बेपत्ता आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हती. महाराष्ट्र शिक्षणासंबंधी नेहमी प्रगत राज्य होतं. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे, हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. दरडोई उत्पन्न असो, अन्य प्रश्न असो प्रत्येक ठिकाणी आज महाराष्ट्र घसरलेला आहे. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !
हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार ; पण…. ?
हेही वाचा…“माधुरीताईंचा चौथा विजय हा रेकॉर्ड ब्रेक होईल”, पर्वतीत देवेंद्र फडणवीसांनी सभा गाजवली