ज्येष्ठ नेते शरद पवार व बारामतीकर यांचं गेल्या 70 ते 80 वर्षांपासून एक अतूट नातं बनलेलं आहे. जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी बारामतीकडे बारकाईने लक्ष असणे, हा शरद पवार यांचा स्थायीभावच आहे. संपुर्ण जगभरात कोरोनाग्रस्तांना उपयुक्त असलेली रेमीडेसेव्हर औषधाची इंजेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीकरांना उपलब्ध करून दिली आहेत.
बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडे पवारांनी ही रेमीडेसेव्हर इंजेक्शन सुपूर्त केली. नागरिकांच्या सोयीसाठी ही इंजेक्शन्स उपयुक्त असून, ज्यांना आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी या इंजेक्शन्सचा वापर करण्यात यावा, अशा सूचनादेखील शरद पवारांनी यावेळी दिल्या.
शरद पवार यांनी बारामतीतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीत गुरुवार पासुन लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीची डॉ. तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोनाची स्थिती आटोक्यात राहील, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी या वेळी दिली.
कोरोनाची स्थिती आटोक्यात राहिल यासाठी आवश्यक सर्व त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी प्रशासनास दिल्या आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ही इंजेक्शन्स प्रभावी ठरली आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातून मागणीही आहे. भारतातही ही लस प्रभावी ठरली आहे.